१० वटपौर्णिमा खास उखाणे | Vat purnima ukhane in marathi for female
Vat purnima ukhane in marathi for female: वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रीसाठी एक खास सण असतो. या सणांमध्ये प्रत्येक स्त्री ही आपल्या नवऱ्यासाठी काही खास उखाणे घेतली जाते. त्याच उखाण्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे काही खास उखाणे जे वटपौर्णिमा साठी वापरण्यात येतील. तर चला पाहूया, या पोस्टमध्ये स्त्रियांसाठी नवनवीन वटपौर्णिमेचे काही खास उखाणे Vat purnima ukhane in marathi for female
Vat purnima ukhane in marathi for female
वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास
…रावांच्यासाठी धरला वटपौर्णिमेचा उपवास.
सावित्री सारखी पतिव्रता, सत्यवानासाठी केली उपासना
…रावांची नाव घेते मिळो त्यांना दीर्घायुष्याची प्रसन्नता.
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करते मनोभावे
…रावांची नाव घेते सुख-समृद्धी लाभो आयुष्यात सदा नव्याने
वडाच्या फांदीला गुंडाळते प्रेमाचा दोरा
….. रावांची नाव घेते संसार नांदो सुखाचा वारा
प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची
…..रावांची नाव घेते सून मी….. घराण्याची
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात
…… रावांची लाभो मला जन्मोजन्मी साथ
वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते
….रावांसाठी मी दीर्घायुष मागते
तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास
…….रावांसाठी धरला मी वटपौर्णिमेचा उपवास
वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग
…….रावांसोबत असताना धरती वाटे स्वर्ग
वडाला घालती फेरे आणि देवाला करते नवस
…..रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस
कांजीवरम साडी, बनारसी खन
…….रावांची नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण
Vat purnima ukhane in marathi for female
वड्यात वडा बटाटावडा
…ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजू न दिली सर्वांना जादूची झप्पी
गणपतरावांचे नाव घेते द्या सगळ्यांनी एक एक पप्पी.
टोपली ठेवले होते आंबे ते गेले सडून,
मदन रावांच नाव घेते नाकातला शेंबुड फुरकन वडून.
गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काला काला goggle,
…. माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.
सप्तपदीच्या वाटेवर ….राव मी तुम्हाला साथ देईन,
पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना मात्र माझ्यासाठी दोन ड्रेस आन चार साड्या पण घेईन.
निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान
अन ….चे नाव घेते खाऊन तंबाखू पान.
सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,
अन आरशात पहा …बाई दिसतेस डुकरावाणी.
लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल,
रोडवरून चालायला लागलीस कि काय दिसतेस तू माल.
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
…. राव घरी परतले नाहीत, कुठे पिऊन पडले कि काय.
Bus stand वर लागलाय सेल अन साड्यांवर आहे म्हणे 10% ची सूट,
अन अक्ख्या गळीत ….बाई तू आहेस काळी कूट.
नव्या आयुष्याची नवी नवी गाणी, अन देशमुखाच्या घराण्यात आमची सासुबाई झाले राणी.
वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्हनणून तुका पाटिल केला.
एक होति चिऊ, एक होता काऊ,
…ना घास भरवला तर मि काय खाऊ?
पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका
….ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का चस्का.
अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***हसतात गोड, पण डोळे वटारायची फारच खोड्.
जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन
… चे नाव घेते … ची सुन.
महाराष्ट्रात एक, फेमस जंगल आहे ताडोबा,
____________ राव बाहेर आहेत मांजर, आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.
कुणी जुगार सट्टेबाज, कोणी खेळतो मुंबई मटका,
________________ अहो कमी खेळा, नाहीतर एक दिवस बसेल मोठा फटका.
पाहुण्यांसाठी कितीही करा, ते ठेवतात नावे,
___________ रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकले असेल तर, आप आपल्या घरी जावे.
तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
______रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
________ राव आहेत, माझ्यासाठी पागल.
उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
तरीपण ________ राव आहेत, माझे मोठे फॅन.
भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,
____________आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.
प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण_______रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.
फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा,
___________रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा.
Vat purnima ukhane in marathi for female
आपल्या love story मध्ये आल्या खूप बाधा
…… राव माझे कृष्ण मी त्यांची राधा
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर
माहेरची खूण
…… रावांचे नाव घेते
…….. घरची सून
चांदीच्या दीव्यात लावते तुपाची वात
………. रावांसोबत करते संसाराची सुरुवात.
निसर्ग रूपी आकाशाला सूर्य रूपी माळी
…….. रावांचे नाव घेते…….. वेळी
Vat purnima ukhane in marathi for female
हे पण वाचा……
The Traitor – हे २० जण पक्के झाले, करण जोहरचा आगामी Relality Show